MNS vs Shiv Sena : शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनसे-शिवसेना ABP Majha

शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना आमनेसामने आलेत. शिवाजी पार्कवर दरवर्षी दिवाळीत मनसेकडून विद्युत रोषणाई करण्यात येते. मात्र आता शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर कायमस्वरुपी रोषणाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. अडीच कोटींचा खर्च अपेक्षित धरुन पालिकेनं या प्रकल्पासाठी निविदा मागवल्यात. यावरुनच आता मनसेनं शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola