MNS vs Amazon | मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन आज मनसेसोबत चर्चा करण्याची शक्यता
मुंबई: अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आणि संकेतस्थळावर मराठी भाषा उपलब्ध करुन द्यावी करावा अशी वारंवार मागणी मनसेकडून केली जात असताना त्याला नकार देत राज ठाकरेंना थेट न्यायालयात खेचल्यानं अमेझॉनविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. पवई आणि साकीनाका परिसरातील ॲमेझॉनच्या कार्यालयासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि चांदिवलीतील कार्यालयही फोडल्याची घटना घडली आहे.
मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन आज मनसेसोबत चर्चा करण्याची शक्यता, अॅमेझॉनकडून चर्चेचा प्रस्ताव