MNS vs Amazon | अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली : अखिल चित्रे
Continues below advertisement
मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.
मनसेने काल अॅमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर अॅमेझॉन आता बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. अॅमेझॉनन काही वेळातच मराठी भाषेच्या पर्यायाबद्दल घोषणा करेल, असं ट्वीट मनसे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे.
Continues below advertisement