Maharashtra Cold Wave | कोकणात थंडीचा जोर वाढला; अनेक गावं दाट धुक्यात हरवली
राज्यात ंथंडीचा कडाका वाढत असताना आता कोकण, रत्नागिरी जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे. अनेक गावं सध्या धुक्यात हरवली असून उशिरापर्यत त्या ठिकाणी सुर्यनारायणाचं दर्शन देखील होत नाही. मुंबई - गोवा हायवेवर देखील सध्या दाट धुकं पसरलं असून त्याचा परिणाम हा वाहनांच्या वेगावर झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पारा 10 ते 12 अंश किंवा त्यापेक्षा देखील खाली गेला आहे. या थंडीमुळे आंब्याला मोहोर येईल अशी आशा देखील व्यक्त केला जात आहे.