Unauthorized transfer of Auto Rickshaw : उशिरा का होईना सरकारला जाग आली : MNS Sandeep Deshpande
Continues below advertisement
कुठल्याही मतांचा विचार न करता किंवा त्यावर डोळा न ठेवता महाराष्ट्राच्या भल्यासाठी व्हिजन मांडणारा नेता राज ठाकरे आहेत. त्यांनी वारंवार सूचना केली होती की कोण आपल्या राज्यात येत आहेत,कुठे राहतात, काय करतात याची माहिती राज्य सरकारला असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्यांची नोंदणी होणं आवश्यक आहे. इंटरस्टेट मायग्रेशन अँक्ट हा भारतात लागू आहे. त्यानुसार इथं जो कोणी कामाला येईल त्याने त्या भागातील कामगार आयुक्तांकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. इथं आल्यावर इथल्या कमिशनर कडे नोंदणी करणं आवश्यक आहे. हा कायदा असून देखील त्याची अंमलबजावणी होत नव्हती परंतु हे राबविण्यात येत नव्हतं सरकारने हे राबवाव. परंतु कालच्या गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकी नंतर हे म्हणता होईल की उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे , असं मतं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलंय.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Auto Rickshaw Mumbai Crime Mns Sandeep Deshpande Sakinaka Rape Case Unauthorized Transfer Of Auto Rickshaws