BMC Elections : मनपा निवडणुकांसाठी मनसेनं कसली कंबर; 100 वार्डांमध्ये करणार सर्वेक्षण

मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंच्या मनसेनं चांगलीच कंबर कसलेली दिसतेय. मुंबईतल्या 100 वॉर्डात सर्वेक्षण करण्यासाठी मनसेनं खासगी एजन्सीची नियुक्ती केल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. तीन टप्प्यात हे सर्वेचं काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, 100 वॉर्डात सर्वे होणार असल्यानं मनसे शंभर वॉर्डात उमेदवार उभे करणार का असा प्रश्नही विचारला जातोय. कुणाशी हातमिळवणी केली की फायदा होईल, कोणत्या वॉर्डात राजकीय चित्र काय आहे? मतदारांना कोणते मुद्दे भावतील याची उत्तर जाणून घेण्यासाठी मनसे सर्वेक्षण करणार असल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola