MNS On Siddhivinayak Temple : सिध्दीविनायक मंदिरात गैरव्यवहारात गैरप्रकार होत असल्याची मनसेची तक्रार

Continues below advertisement

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिराच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. सिद्धीविनायक भक्तांच्या पैशांचा मंदिर समितीकडून गैरवापर होत असून याबाबत चौकशी करावी अशी मागणी मनसेने केली आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सिद्धीविनायक मंदिर प्रकरणात आरोप केले आहेत. सिद्धीविनायक मंदिराच्या दुरुस्ती आणि इतर निविदांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंदिराच्या नूतनीकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या निविदेनुसार १८ महिन्यांत दुरुस्तीचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. अन्यथा मंदिर समितीकडून प्रतिदिन १० हजार दंड वसूल करण्याचे आदेश होते. पण अधिकचे सात महिने उलटूनही संबंधित कंत्राटदारांविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मंदिर समिती आणि इतर निविदांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram