KDMC Potholes : 15 दिवसात खड्डे भरा, अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल : MNS MLA Raju Patil

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकार्या समवेत पाहणी केली .यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत 15 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. आता सहनशीलतेचा अंत झालाय ,15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भराव लागेल  असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदाराणा दिला .यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करत टक्केवारित सगळं अडकलय ,सत्ताधारी वाघाचा वाटा खातायत ,अधिकारी ठेकेदारावर कारवाई करून काय होणार वाघाचा वाटा जातो कुणाकडे असा सवाल केला .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola