MNS Gujrati Flex | मनसेचं गुजराती प्रेम; मतदारांना आकर्षित करण्यासाठी सदस्य नोंदणीचे फलक गुजरातीत

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्ष सध्या बिगर मराठीभाषिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी मराठीचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही घाटकोपर पूर्व विभागात नवीन सदस्यनोंदणीसाठी गुजराती भाषेत फ्लेक्स लावले आहेत. घाटकोपर पूर्व हा गुजरातीबहुल मतदार असलेला परिसर आहे. त्यामुळं मनसेनं घाटकोपर पूर्वच्या चौकाचौकात गुजराती भाषेत सदस्यनोंदणीसाठीचे फ्लेक्स लावले मुंबईमधल्या काही विभागांत गुजरातीभाषिक मतदारांचा कौल निर्णायक  आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना गुजरातीभाषिक मतदाराना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहे. आणि आता तर मनसेनंही चक्क गुजराती भाषेत सदस्यनोंदणीसाठी फ्लेक्स लावले आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola