MNS MahaMorcha | महामोर्चात सहभागी होण्याआधी राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं | ABP Majha
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे.