MNS vs Shivsena : दसरा मेळावा षण्मुखानंदमध्ये झाला तर गुन्हा दाखल करणार; शिवसेने विरोधात मनसे आक्रमक

शिवसैनिकाचे (Shiv sena) लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची (shiv sena dasara melava) जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार आहे.गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावापार पडणार आहे. 22 तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमेतनं सुरु होणार आहेत. मात्र नाट्यगृहं आणि थिएटर्स दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्याची मागणी मनसे नेते अमय खोपकर यांनी केली आहे. दसरा मेळावा षण्मुखानंदमध्ये झाला तर गुन्हा दाखल करणार असल्याच ही खोपकर यांनी सांगितलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola