MNS Civil Disobedience | मनसेचा सविनय कायदेभंग; काही दिवसांनी लोक रस्त्यावर उतरतील : अविनाश जाधव
मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज (21 सप्टेंबर) सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. मात्र येत्या काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र होईल, लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
Tags :
Civil Disobedience Movement Savinay Kayadebhang Akshay Bhatkar Civil Disobedience MNS Agitation Avinash Jadhav MNS Mumbai Local Mumbai News