Mumbai Local : लोकलच्या ट्रॅकवर ठेवला लोखंडी ड्रम, मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
abp majha web team
Updated at:
03 Sep 2022 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Local News : मुंबईत लोकलसमोर (Mumbai Local) रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सँडहर्स्ट रोड (Sandhurst Road) -भायखळा (Byculla) स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळावर 15 ते 20 किलो दगडानं भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. मात्र प्रसंगावधान दाखवत मोटरमन अशोक शर्मा यांनी अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. अशोक शर्मा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. अशोक शर्मा यांच्या कृत्याचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जात आहे.