Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहन वापरा, पेट्रोलचे पैसे वाचवा! राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण आज जाहीर केलं. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आणि इंधनामुळं होणारं प्रदूषण या समस्यांवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरणपूरक असा पर्याय आहे. त्यामुळं एप्रिल २०२२ पासून मुख्य शहरांतील सर्व नवीन सरकारी वाहनं ही इलेक्ट्रिक असणार आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी सुविधा असलेलं पार्किंग खरेदी करण्याचा पर्याय देणं निवासी प्रकल्प विकासकांना बंधनकारक असणार आहे.