MIDC चा नवा विक्रम, एका दिवसात 355 कोटींची गुंतवणूक, 500 स्थानिकांना रोजगार
Continues below advertisement
एकाच दिवसात तब्बल ३५५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याचा विक्रम एमआयडीसीनं केला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं जातं. उत्तम पायाभूत सुविधा आणि सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी लागणारा कमीत कमी वेळ यामुळं इतर राज्यांमधील उद्योजकही आता महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. कोईम्बतूरची एल जी बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिडेट या कंपनीला नागपूरमधल्या बुटीबोरीमध्ये ६० हजार चौरस फूट जागा एकाच दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एमआयडीसीनं उचललेल्या या पावलामुळं ५०० स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत.
Continues below advertisement