Mhada lottery | गिरणी कामगारांसाठी खुशखबर; 3894 घरांसाठी सोडत | ABP Majha
गिरणी कामगारांच्या घरांची प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या आज तीन हजार 894 घरांची सोडत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना हाती घेतली आहे. सुमारे पावणे दोन लाख कामगार, वारसदारांना ही घरे पुरविण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे.