Maratha Andolan Azad Maidan | मुंबईत आझाद मैदानातील मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली
Continues below advertisement
शहरातील आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकाची प्रकृती खालावलीय. इथं एका आंदोलक तरुणाला भोवळ आलीय. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. मात्र, या आंदोलकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय
Continues below advertisement