Mumbai Govar Infection : मुंबईत गोवरचा विळखा, नवजात बालकांबाबत चिंता
मुंबईत गोवरचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागलाय आणि गोवरची साथ आटोक्यात आणण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे. गोवरमुळे २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ७ बालकांचा मृत्यू झालाय. तर सध्या शहरात ६१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोवरची साथ वाढत असताना मुंबईत २० हजारांवर मुलांना गोवरची पहिली किंवा दुसरी लस अजून मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेनं आता लसीकरणावर भर दिलाय.
Tags :
Vaccine Hospital Challenge Measles Treatment MUMBAI Vilkha Measles Epidemic In Front Of Municipal Corporation Death Of 7 Children