BEST Women Buses : मुंबईत 70 मार्गांवर महिलांसाठी विशेष 100 गाड्या,महापौरांच्या हस्ते बसेसचं उद्घाटन
Continues below advertisement
मुंबईत बेस्टनं महिलांसाठी अनोखी भाऊबीज भेट दिली आहे. मुंबईतल्या 70 मार्गांवर महिलांसाठी नव्या 100 बेस्ट बस धावणार आहेत. या बेस्ट बसेसचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. या शंभर बसेसपैकी 90 टक्के गाड्या वातानुकूलित असतील. 10 मार्गांवर फक्त महिला स्पेशल बसगाड्या असतील. तर उर्वरित मार्गावर महिलांना प्राधान्य असेल.
Continues below advertisement