ABP News

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी

Continues below advertisement

मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा निर्णय दिला असून आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्यानं सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरूवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीनं नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली होती. तसेच नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचेही हायकोर्टाला साकडे घातले होते. दरम्यान या विनंतीला न्यायमूर्तींकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्यानं सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. सोबतच याचिकाकर्त्यांना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्यानं अर्ज करण्याचे ही कोर्टानं निर्देश दिले आहेत. 

याचिकाकर्त्यांची विनंती मुख्य न्यायमूर्तींकडून मान्य

पुढे आलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने  पुन्हा नव्याने सुनावणी होणार असल्याचे निर्देश दिले असले तरी, कुठेतरी मराठा आरक्षणाची सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण याआधी ज्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली  कोर्ट या प्रकारणी सुनावणी घेत असत ती सुनावणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. जवळजवळ 60 टक्के ही सुनावणी पूर्ण झाल्याच्या मार्गावर होती. यात याचिका करतेच आहे युक्तिवाद झाला होता तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता.

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता 

दरम्यान पुन्हा एकदा याची कागर त्यांना संधी देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होणार होतं. मात्र दरम्यानच  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे ही सुनावणी पुन्हा नव्याने नव्या न्यायपिठापुढे होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा कालावधी कुठेतरी ग्राह्य धरला जाईल. मुळे दोन्ही बाजूच्या सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांना नव्याने आपलं म्हणणं मांडावं लागेल. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram