Mumbai Malad- Kandiwali मार्गातील अडथळा दूर: वाहतूककोंडी आता फुटणार ABP Majha

मुंबईत पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी आता फुटणार आहे. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला संकुल या तेराशे मीटर रस्त्याच्या मार्गातील अडसर दूर झालाय. या मार्गावरील १२० फुटी रस्त्याचे काम पूर्ण झालं होतं. मात्र मधल्या ४०० मीटर रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने अनेक वर्षे रखडले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याने आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola