Majha Maharashtra Majha Vision | दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
काही नात्यांमध्ये लिहून घेतलं जात नाही. शिवसेना आणि भाजपनं कधी एकमेकांकडून कधी काही लिहून घेतलं नाही. शिवसेना आणि भाजपचं नातं तुटलेलं नाही. दोन भावांमध्ये देखील भांडणं होतात. दोन भाऊ व्यावहारिक कारणामुळे वेगळे झाले झाले आहेत. म्हणून त्यांच्यातलं नातं कधी तुटत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.