Mahim Dargah : माहिममध्ये समुद्रात लोकांची गर्दी दिसली, ड्रोनची दृष्य 'माझा'च्या हाती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केलाय. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवलाय. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. जर हा दर्गा हटवला नाही तर, त्याच्या शेजारीच गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola