Mumbai Local Maharashtra मध्ये निर्बंध शिथिल झाल्यानं Delta Plus चा धोका वाढण्याची शक्यता: ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. आज 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे. 

राज्यात आज 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0),  धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74),  नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5),  बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94)  गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram