Maharashtra Unlock : मुलांचं लसीकरण नाही, पण मॉल्समध्ये प्रवेश! मग शाळा का बंद? ABP Majha

Continues below advertisement

18  वर्षांखाली मुलामुलींना राज्यातील सर्व मॉल्समध्ये सशर्त प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. कारण १८ वर्षांवरील सर्वांना लोकलप्रमाणेच मॉलमध्ये प्रवेशासाठी दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाल्याचं निश्चित करावं लागतं. पण, भारतात अजूनही लहान मुलांसाठी लसीकरणाला परवानगी मिळालेली नाहीय. त्यामुळे लहान मुलांच्या मॉल प्रवेशासाठी सरकारकडून नियमावलीत सुधारणा करुन वयाचा पुरावा दाखवण्याची अट लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांनी सवाल उपस्थित केलेत. मुलांचं लसीकरण झालं नाही  आणि कोरोनाचा धोका म्हणून शाळा बंद ठेवता, मग मुलांना मॉल्समध्ये प्रवेश देताय, तिथे कोरोनाचा धोका नाही? का असा सवाल विचारण्यात येतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram