ST Workers Strike : मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा अनेक ठिकाणी संप
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली असली तरी राज्यातील अडीचशे पैकी ५९ डेपोंमध्ये आज काम बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झालेत. दुसरीकडे उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडेही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यामुळे आता उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी विचारणा करत उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. गेवराईसह काही बस डेपोमधून एकही बस आज बाहेर पडली नाही. एसटीला राज्य सरकारमध्ये विलिन करावं, या प्रमुख मागणीसाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत.
Continues below advertisement