MARD Doctor Strike : 'मार्ड'च्या संपामुळं आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता, काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?
Continues below advertisement
Mard Doctor Strike : आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांचा संप होऊ नये म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे. कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. संपादरम्यान कोरोनाबाधितांच्या उपचारात खंड पडणार नाही, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Continues below advertisement