Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
Continues below advertisement
पहाटेपासून मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलाय. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळतेय.. तर तिकडे आज समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
Continues below advertisement