Jitendra Awhad : अनंत करमुसे मारहाण आणि अपहरण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन
मुंबई : अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांना तात्काळ जामीनही मिळाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील तरुणाने केली होती. .दरम्यान, आज वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांची दहा हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली.