Parambir Singh : परमबीर सिंह यांची एसीबी चौकशी करण्यास राज्य सरकारची परवानगी

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे. दुसरीकडे परमबीर सिंह सिक लिव्हवर असल्यानं त्यांची विभागीय चौकशी रखडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करून राजकीय धमाका करणाऱ्या परमबीर यांनी रजा वाढवली आहे. ३० एप्रिलपासून परमबीर रजेवर आहेत. सुरुवातीचे काही दिवस वगळता नंतर ते सिक लिव्हवर आहेत. परमबीर यांच्याविरुद्धही भ्रष्टाचार, खंडणीच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची सीआयडी आणि अन्य यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. पण आजारपणाचं कारण देत ते एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram