Mumbai Local : सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार आज उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार

Continues below advertisement

#MumbaiLocal #BombayHighCourt 

मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत असताना मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल अजूनही सर्वसामान्यांसाठी सुरु झालेली नाही. याबाबतीत आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. कारण लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार असल्याची भूमिका राज्याच्या महाधिवक्त्यांनी कोर्टात मांडली. पण याबाबतची सविस्तर भूमिका आज कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे. लोकल प्रवासासाठी लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामा्न्यांचाही विचार व्हावा, अशा सूचना कोर्टानं सरकारला दिल्यात. त्यामुळे जर लोकल सुरु नसेल तर कर्मचारी वर्ग कार्यालयात वेळेत कसा पोहचणार आणि सार्वजनिक रस्ते वाहतुकीवरही ताण वाढत असल्याचं मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज राज्य सरकार मुंबई लोकलबाबत काय भूमिका स्पष्ट कऱणार हे पाहणं महत्वाचं असेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram