Maharashtra Corona Crisis | परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार : नवाब मलिक
Continues below advertisement
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या पाहता राज्य शासनाच्या आणि टास्क फोर्सच्या बैठकींची सत्र सुरु आहेत. यातच राज्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लावला जाण्याची चिन्हं जवळपास स्पष्ट झाली आहेत. पण, हा लॉकडाऊन नेमका कसा असेल याबाबतची माहिती मात्र समोर आलेली नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात सध्याच्या घडीला सेमी लॉकडाऊनची परिस्थिती असल्याचं लक्षवेधी वक्तव्य केलं. त्यामुळं येत्या काळात कडक लॉकडाऊन लागणार, की राज्य शासनाकडून सेमी लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement