Maharashtra Cabinet Meeting : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव
State Cabinet Meeting Todays Big Announcements : वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचं नाव दिलं जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting) हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी न्हावा शेवा (Sewri–Nhava Sheva Sea Link) अटल सेतू असं नाव दिलं जाईल. एकंदरीत नामकरणांचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तर, राज्यात तब्बल 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याचा फायदा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जलसंपदा विभागामार्फत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी करणारं पत्रं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली.