Palghar : पालघर जिल्ह्यात BJP आणि MNS युती होण्याची शक्यता; Kapil Patil, Avinash Jadhav यांची भेट

Continues below advertisement

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी पोट निवडणूक होत असून या  निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे नातं जुळण्याची शक्यता निर्माण झाली असून याच पार्श्वभूमीवर आज वाडा येथे भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते यावेळी कपिल पाटील यांनी बोलताना सांगितलं की मागच्या निवडणुकीत आमची युती होती त्याप्रमाणे मनसे आता एकत्र आली तर ती चांगली गोष्ट आहे तर अविनाश जाधव यांनी याच वाक्याला दुजोरा दिला असून आम्ही पुन्हा काही जागांवर तोडगा काढला असून एकमेकांसाठी मदत करत आहोत त्यामुळे जिल्ह्यात भाजप मनसे एकत्र आल्याचं चित्र स्पष्ट झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram