Maharashtra High Speed च्या दिशेनं, प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

CM Uddhav Thackeray Letter To PM Narendra Modi : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलं आहे. नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे हैदराबाद या हायस्पीड रेल्वे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन बुलेट ट्रेनचा प्रस्ताव पंतप्रधनांना पत्रातून दिलेला आहे. या बुलेट ट्रेनचा उल्लेख रेल्वे मंत्रालयाकडूनही करण्यात आला होता. त्यातील पहिला प्रस्ताव म्हणजे, नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी आणि त्यासोबतच समृद्धी महामार्ग जो आहे, त्याच्या बाजूला जमीन आहे, त्यामुळे जमीन अधिगृहणही कमी करावं लागेल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीचा मंजूर झालेला बुलेट ट्रेनचा प्रस्ताव गुजरात-मुंबई याचा या पत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola