Mahaparinirvan Din | भीमसैनिकांनी आज शिस्तीचं आणि संयमाचं अद्भूत दर्शन घडवलं : उद्धव ठाकरे

Continues below advertisement

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. पण यंदा कोरोनाचा संसर्ग परसू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन राज्य सरकारसह मुंबई पालिकेने केले आहे.

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड  यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.  तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram