Mahaparinirvan Din | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. पण यंदा कोरोनाचा संसर्ग परसू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन राज्य सरकारसह मुंबई पालिकेने केले आहे.