Mumbai : Mahaparinirvan Din 2021 : मुंबईतील चैत्यभूमीवरील परिस्थिती नियंत्रणात ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील चैत्यभूमीवरील परिस्थिती नियंत्रणात आलीय. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सुविधा दिल्या नसल्याचा आरोप करत काही संघटनांनी ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना बाहेर काढलं. चैत्यभूमीवर बॅरिकेटिंग करण्यात आली असून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. यानंतर चैत्यभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आलीय. दरम्यान काही संघटना प्रसिद्धीसाठी अशी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी अनुयायांना शांततेचं आवाहन केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram