Nagpur : Mahametro : अॅल्युमिनियमपासून 3 कोचेस असलेली महामेट्रो पुण्याला रवाना
Nagpur : नागपुरात मेड इन इंडिया मेट्रो कोच तयार झालेत. अॅल्युमिनियम धातूपासून तीन कोचेस असलेली महामेट्रो पुण्याला रवाना झालीय. २०१५ मध्ये नागपूर मेट्रोसाठी कोचेस निर्माण करणारी भारतात एकही कंपनी नव्हती.मात्र आता देशात कोचेस निर्माण झाले. या नवनिर्मित अॅल्युमिनियम कोचसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांत वापरलेले अनेक सुटे भाग देशातच तयार झालेत.