Mumbai Local | मुंबई लोकल सर्वांसाठी लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई : सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा सवाल लाखो मुंबईकरांना पडला आहे. आता लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.