उद्यापासून दोन डोस घेतलेल्यांचा लोकलप्रवास, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त
Continues below advertisement
उद्यापासून दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आरपीएफने देखील तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या स्टेशनवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. अधिकच्या प्रवाश्याना सामावून घेण्यासाठी आर पी एफ जवानांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या मध्य रेल्वेवर 17 ते 18 लाख तर पश्चिम रेल्वेवर 14 ते 15 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र त्यात 5 ते 6 लाख प्रवाश्यांची वाढ येणाऱ्या दिवसात होऊ शकते. त्यामुळे आरपीएफ कामाला लागले आह. स्टेशन वर गर्दी होऊ नये, प्रवाशांनी सर्व नियमांचे पालन करावे, विना टिकीट प्रवास करणाऱ्य प्रवाशांवर प्रतिबंध आणावा, तसेच covid-19 संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आरपीएफ सतर्क असणार आहे.
Continues below advertisement