Mumbai Local : दोन डोस घेतलेल्यांचा लोकल प्रवास; डोंबिवली स्थानकावरची गर्दी वाढली
कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर आज गर्दी वाढण्याची शक्यता आहे. काल आठवड्याचा पहिला दिवस होता पण पारशी नववर्ष दिनाची सुट्टी असल्यानं शासकीय कार्यालयं बंद होती. पण आज सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयं सुरु असल्यानं कर्मचारी वर्ग आणि दोन डोस घेतलेले नागरिक घराबाहेर पडणार असल्यानं लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजूनही अनेक लोकांचे दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सकाळी गर्दीची वेळ असूनही ठाणे रेल्वे स्थानकावर म्हणावी इतकी गर्दी दिसून आली नाही. तर तिकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लसीकरणानंतर सर्वात जास्त पास वितरीत झालेलं रेल्वे स्थानक म्हणजे डोंबिवली.... तिथं आज काय चित्र आहे , पाहुयात