मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी हवाई सर्व्हेला सुरुवात, लिडार सर्व्हेद्वारे नकाशा तयार करणार
मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी हालचाली सुरु झाल्यात आणि त्यासाठी पहिला लिडार सर्वे काल करण्यात आला. नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनतर्फे हा सर्वे सुरू करण्यात आलाय. 736 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर नागपूर, खाप्रि डेपो, वर्धा, पुलगाव, करंजाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर आणि मुंबई अशी स्थानकं असतील. या मार्गावर लिडार म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्वे करण्यात आला.