बैलाचा वाढदिवस साजरा करणं महागात, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने बैल मालकावर गुन्हा
कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले तरी दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. वाढदिवस, लग्न, हळदी समारंभांच्या पार्ट्यांनंतर आता डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बैलाचा वाढदिवस साजरा करत असताना फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात हा प्रकार घडला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते. पोलिसांनी संबंधित बैलाचे मालक किरण म्हात्रेंवर गुन्हा दाखल केलाय.