Lata Mangeshkar Hospitalised: लता मंगेशकर यांना कोरोना, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग झालाय. उपचारासाठी लतादीदींना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांना चेस्ट कंजेशन आणि न्यूमोनिया असल्याचं दिसून आलं. लतादीदींचं वयही अधिक असल्यानं खबदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola