Lalbaugh Raja : यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला चक्क बाईक गिफ्ट, राजाला भरभरुन दान : ABP Majha
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला चक्क बाईक गिफ्ट मिळाली... लालबागच्या राजाला भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला दान देताना तब्बल 5 किलो 424 ग्रॅम सोने तर 60 किलो 341 ग्राम चांदी लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केली आहे. तर दहा दिवसात पाच कोटी पेक्षा जास्त रोख रक्कम भाविकांकडून लालबाग राजाच्या दानपेटीत जमा झाली असल्याची माहिती लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिली आहे