Lalbaugcha Raja Visarjan Delay | लालबागच्या राजाचं विसर्जन नेमकं कशामुळे रखडलं?
Continues below advertisement
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल तीस तासांहून अधिक काळ उशीर झाला आहे. गुजरातवरून खास बनवून आणलेल्या नव्या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्यात अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर यश आले आहे. मात्र, विसर्जनासाठी आता भरतीची वाट पाहावी लागणार आहे. रात्री साधारणपणे साडेदहा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सकाळी समुद्राला भरती आल्याने मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी आल्या. यंदा विसर्जनासाठी आणलेल्या नव्या तराफ्याची उंची जास्त असल्याने मूर्ती उचलून ठेवण्याची वेळ आली. भरतीच्या लाटांमुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडथळे आले. भरतीच्या वेळी चौपाटीवर मूर्ती कमरेपर्यंत पाण्यात गेली होती. संध्याकाळी ओहोटीनंतर पुन्हा विसर्जनाची तयारी सुरू झाली आणि काही वेळापूर्वी मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात यश आले. 'लालबागचा राजा हे करोडो भाविकांच्या श्रद्धा असताना, उशिरा झालेल्या विसर्जनामुळे लालबागचा राजा मंडळाकडून सर्वप्रथम दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.' भरतीची योग्य वेळ आणि विसर्जनाच्या नियोजनात काहीसा गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement