लालबागचा राजा च्या दरबारात पुन्हा एकदा पोलिस-स्थानिक यांच्यात वाद, मार्ग बंद केल्याने बाचाबाची

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलिस आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहीला.  गणेशोत्सवात गणेशभक्तं रात्रीच्या वेळी जागरणं करतात. या वर्षी कोविड १९ संसर्गामुळे कडक निर्बंधांसह मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांचे दोन डोस झालेले आहेत अशा मर्यादीत कार्यकर्त्यांना परवानगी राज्याच्या गृह विभागाने दिलीय. मात्र असं असतानाही पोलिसांनी रात्रीच्या जागरणाला परवानगी दिली नाही. त्यातच स्थानिक रहिवाश्यांच्या बिल्डिंग आणि चाळींमध्ये येण्याजाण्याच्या मार्ग पोलिसांना बँरिगेटींग केल्यामुळे बंद करण्यात आलेत. आज पहाटे कामावर जाणार्या रहिवाश्यांना त्यामुळे बाहेरही पडता आले नाही. कामासाठी बाहेर पडणार्या रहिवाश्यांची त्यामुळे पोलिसांसी बाचाबाची झाली.  पोलिस जसे पोटापाण्यासाठी त्यांची नोकरी करतायेत तसेच स्थानिक रहिवाश्यांनाही नोकरी धंदा आहे. त्यांनी पुढील १० दिवस पोलिसांच्या बँरिगेटींगमुळे घरातच बंदिवासात रहायचं का..? असा प्रश्नं लालबागमधील स्थानिक रहिवाशी विचारत होते. अखेर रात्रभर चाललेल्या या वादावर सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांनी चर्चा करून बिल्डिंग आणि चाळींच्या प्रवेशद्वारावर लावलेेले बँरेगेटिंग हटवले. आणि स्थानिक रहिवाश्यांनी जाण्या येण्यास मार्ग करून दिला.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola