Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Continues below advertisement
कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये मुला-मुलीसोबत नेमकं काय घडलं? (Mumbai Kurla Phoenix Mall News)
- ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये आले होते. साधारणपणे दुपारी चारच्या दरम्यान फिनिक्स मॉल फिरायला आले होते.
- फिनिक्स मॉलमधून बाहेर आल्यानंतर ते फिनिक्स मॉलजवळ असलेल्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये फोटो काढण्यासाठी गेले.
- महाजन गार्डनमध्ये फोटो काढत असताना सात आठ अल्पवयीन मुलांनी त्यांना मारायला सुरुवात केली.
- हातात असलेल्या काठीने सुरुवातीला मुलाला मारायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्यासोबत असलेल्या मुलीलासुद्धा त्यांनी मारहाण केली.
- या मारहाणीमध्ये मुलगा मुलगी जखमी झाले आणि त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले.
- घाटकोपर पोलीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण केलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये बोलण्यात आलं.
- ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते या परिसरात राहत नाहीत. फिनिक्स मॉलमध्ये ते दोघे आले होते. मुलगी मुलगी मराठी मुलगा साताऱ्यामध्ये राहतो.
- मुलगा मुलीला भेटण्यासाठी साताऱ्याहून मुंबईत आला होता आणि दोघेही मित्र मैत्रीण असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले.
- महाजन गार्डनमध्ये गार्डन तयार झाल्यापासून इथे आजूबाजूचे रहिवासी पार फिरायला येत नाहीत अनेक गर्दुल्ले इथे बसलेले असतात. या प्रकारच्या तक्रारी सुद्धा स्थानिकांनी केल्याचं म्हटलं आहे.
- मारहाण झालेले मुलगा 21 वर्षाचा आणि मुलगी 19 वर्षाची आहे. तर मारणारे मुलं हे अल्पवयीन आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement