Kunal Kamra Petition:आयटी कायद्यातील नव्या दुरूस्तीविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी 6 जूनपर्यंत तहकूब
Continues below advertisement
आयटी कायद्यातील नव्या दुरूस्तीविरोधात हास्यकलाकार कुणाल कामरानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.. या याचिकेवरील सुनावणी 6 जूनपर्यंत तहकूब करण्यात आलीये. दोन्ही बाजूंनी अंतिम मसूदा 6 जूनपर्यंत सादर करावा असे आदेश हायकोर्टाने दिलेत... तसेच याचिकाकर्त्यांना याचिकेत 2 मेपर्यंत नव्यानं सुधारणा करण्याची मुभा देण्यात आलीये... तर आयटी कायद्यातील नव्या तरतूदींनुसार 5 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिलीये.. यामुळे कलाकारांना दिलासा मिळालाय.. आयटी काद्यातील दुरूस्तीला दिलेलं आव्हान सुनावणीसाठी योग्य असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.
Continues below advertisement